दुस्तर हा घाट आणि थांग ह्या दोन कथा.
गौरी देशपांड्यांच्या कथांचे वैशिष्ठ्य म्हणजे स्त्री जीवनाचे विविधांगी रुप. स्त्री मनाची आंदोलने आणि त्याचा ठाव अगदी समर्थपणे त्या मांडतात. त्यांच्या कथांतील नायिका ह्या परिस्थितीला शरण जाणा-या असल्या तरी त्यातुन स्व:ताचा मार्ग चोखंदळ्पणे निवडून स्व:ताच्या अस्तित्वाची जाणिव सर्वांना करुन देउन मार्गस्थ होणा-या आहेत.
दुस्तर हा घाट मध्ये अशी एक सर्व सामान्य घरातील नायिका नमु, आई वडिलांचे छत्र नसल्यामुळे या ना त्या नातेवाईकांकडे वाढलेली. जिथे ज्या घरी असेल त्या घराच्या परिस्थितीला रुळुन स्व:तात बदल घडवून आणण्याची सहजता तिच्या अंगी आलेली आहे. कोणा नातेवाईकाने तिच्या शिक्षणात कधी आडकाठी केली नाही.
महाविद्यालयात प्रवेश केल्यावर तिचे इंग्रजी भाषेबद्दलचे, साहित्याबद्दलचे प्रेम तिला इंग्रजी भाषेचे शिक्षक हरिभाई ह्याची सर्वात आवडती शिष्या बनवते आणि त्यातुनच तिची ओळख त्यांचा मुलगा वनमाळीशी होते आणि मैत्रीची परिणीती विवाह बंधनात. लग्नाला होकार देण्यापूर्वी हरिभाई तिला विचारतात की तुझा हा निर्णय सर्व विचार केल्यानंतरच तू घेतला आहेस ना? त्याचे सारे गुन्हे माफ करुन त्याला तू नि:खळ प्रेम देऊ शकशील ना? या वर ती काहीच बोलत नाही तसेच तिला हरिभाईंच्या प्रश्नामागचा हेतूही कळत नाही.
लग्नानंतरचे दिवस म्हणजे स्वप्नझुल्यावरच्या हिंदोळ्यासारखे सरत जातात. एकमेकांत गुंतत जातात. मग अवचित पणे वनमाळिचा मित्र अलिस्टर प्रवेश करतो.त्याच्यात तिला एक खरा मित्र भेटतो ज्याच्याजवळ ती मनातला सारा मळभ रिता करु शकेल इतकी पवित्र मैत्री त्याच्यात होते.
अलिस्टरची बदली वनमाळी आपल्याबरोबर भारतात करवून घेतो. एक दिवस अचानक अलिस्ट्रच्या बायकोकडून वनमाळीचे दुस-या स्त्रीशी असलेले संबंध कळतात. प्रथम अविश्वास वाटावे असे हे विधान जेव्हा सत्याचे रुप घेऊन समोर उभे रहाते तेव्हा ती आतून पोखरुउन गेलेल्या खांबागत होते. आयुष्यात जीव तोडून केलेल्या प्रेमाची अशी प्रतारणा व्हावी ह्यांची खंत मनात सलत असतांनाच ती घर सोडून हरिभाईंकडे त्यांच्या गावातील घरात राहायला जाते. तिथेच पुढे शिकायचा निर्णय घेते. पण PhD साठी तिला मुंबईत वनमाळीकडेच जावे लागेल इथुन तिला पुढचे शिक्षण शक्य नाही असे जेव्हा हरिभाऊ सांगतात. तेव्हा ती सहजतेने परत विरलेल्या वाटेवरुन घरात प्रवेश करते. अभ्यासाच्या खोलीला स्व:ताच्या खोलीचे रुप देते आणि नव्या जोमाने शेक्सपिअरच्या प्रेमात पडते. थकलेले हरिभाऊ जगाचा निरोप घेतात.
गावातल्या वास्तव्यात तिची सखुबाई, तिचा मुलगा काळू याच्याशी जमलेले वात्सल्याचे नाते गहिवरते. नकुल ह्या आर्मी मधील पाय गमावून बसलेल्या सैनिकाशी औपचारिक मैत्री होते. साधी सरळ राहाणी हा तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनुन रहातो. तरी जुनी नाती ती तोडत नाही.्वनमाळी बद्दलची ओढ वा त्याची तिच्याकडे घेतली जाणारी धाव कमी होत नाही. जेव्हा तिला त्याच्या आईचे मतिमंदत्व आणि त्याने त्यावर स्व:तासाठी घेतलेला निर्णय की ज्यामुळे नकळत मातृत्वाच्या अनुभवाला पारखी झालेली नमू एका तठस्थ भूमिकेतून आपले नाते सांभाळते.सा-या मनांतील भावनांना कायमचे कोंडून अशाररिक प्रेम वनमाळीला देते. जेव्हा तो परत येण्याची तिला साद देतो तेव्हा दुस्तर अशा घाटावर ती एकटे रहाणे कबूल करते.
दुसरी कथा "थांग" ह्या कथीतील एक धागा मला नकळत पाऊलो कोलिओच्या ’ब्रिडा’ या कथेची आठवण देउन गेला. तो धागा म्हणजे 'Soulmate' .
कालिंदि नंदन बरोबर भारत सोडून परदेशात रुळू पाहातेय. कंपनीच्या जवळच सगळ्यां सहका-याची वसाहत असते. तिथेच वेगवेगळ्या देशातून आलेल्या सहका-यांच्या परिवांशी होणा-या भेटीगाठी, त्यांची औपचारिकता,त्यातील सहजता तर कधी फोलपणा हे साध्या सरळ आणि एकदम कोणात न मिसळणा-या कालिंदिला हळू हळू समजु लागतो. त्यात तसेच काळ्या सावळ्या रंगामुळे तसेच घरातील पैशाच्या चणचण परिस्थितीमुळे लग्न न ठरु शकणा-या कालिंदिला अचानक नंदन सारख्या गैर मराठी पण तिच्याच ऑफिस मध्ये मोठ्या हुद्द्यावरअ सलेल्या नंदनने घातलेली मागणी,लग्न आणि नंतर तिने गमवलेली तिची मंद अपंग मुलगी मंदा.ह्या सगळ्याचा अनुभव पाठीशी बाळगुन असणारी कालिंदी. चार चौघातही नंदन तिचा अपमान करायला मागे पुढे पाहत नाही. वेळेवेळी केलेला तिचा उपमर्द जणु तिच्या अंगवळणीच पडल्यागत झाले आहे. जर कधी तसे घडले नाही तर त्याचे तिला नवल वाटते. ह्या त्याच्या स्वभावला मोड घालतात त्याचे वरिष्ठ सहकारी दिमित्री आणि सहसहकारी इयान.
दिमित्री आणि इयान यांना कालिंदि बद्दल एक ओढ आहे. प्रत्येकाची आपली एक सांसारिक कहाणी आहे. दिमित्रीची बायको सर्वांत सुंदर ’आंगलीकी" तर इयान्ची बायको सुझी ही कर्तव्यदक्ष पण नव-याच्या बहकेल पणाला ओळखून असणारी आणि कालिंदिला सावध करणारी. इतर जोडपी विलेम-रने, बिरेन्द्र आणि कल्पना.
दिमित्री कालिंदिच्या मनातील डोहाच्या तळाशी पोहचून तिचा थांग घेऊ पहाणारा तर इयान वर वर उथळ पाण्यात तिच्या शरिराकडे आकर्षित होणारा.ते मिळाल्यावरही परत ओढ घेणारा.
दिमित्रीच्या स्वभावात एक संयम आहे, समतोल आहे.जे आवडतय ते ओरबाडून घेण्याची इच्छा नाही. त्या आवडीचा थांग घेण्याची प्रबळ आकांक्षा आहे. एका अपघातात विकलांग अवस्थेत दवाखान्यात पलंगावर असतांना कालिंदीला झालेली अनुभूती तिला त्याच्या जवळ खेचते. ती मनाने पूरण्पणे त्याच्यात गुंतते. नंदन फक्त शरीराचा स्वामी उरतो.तरी शेवटी ती परत भारतात परतण्याचा ाणि नंदन पासून वेगळे होण्याचा जेव्हा निर्णय घेते तेव्हा ही नंदन अगदी व्यवहारीक बोलतो पण शेवटी उच्चारतोच की तू दिमित्रीकडे जाणार ना?
thang vilem rane, iyan suzi, dimitri aangoliki, birendra kalpna.....kalindi nandan kanta.
No comments:
Post a Comment