Tuesday, August 4, 2009

"दी सर्कल ऒफ दी कर्मा"


"दी सर्कल ऒफ दी कर्मा" ही भुतान मधल्या एका छोट्याश्या खेड्यातल्या ’सोमो’ नावाच्या मुलीची जन्मकहाणी.

लहानपणापासुन येणा-या प्रत्येक क्षणाला स्विकारत जीवन प्रवास करणारी,कधी खेद वाटला तरी तक्रार न करता अव्याहत पुढे जाणारी सोमो तिच्या आध्यात्मिक ध्येयाप्रत कशी पोहचते ह्याची ही सरल जीवन गाथा.

या पुस्तकात भुतान पासुन सुरु होणारा तिचा प्रवास भारत आणि शेवटी नेपाळ पर्यंत येउन थांबतो.

जी बंधने जन्माने आणि कर्माने तिने जोडलेली असतात ती ह्या प्रवासात कालप्रवाहात दूर होतात आणि शेवटी नेपाळमध्ये परत सांधली जातात.संपूर्ण पुस्तकात तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीl तिचा अनाठायी क्रोध वा आक्रोश दिसत नाही तर तिने केलेला संयमपूर्वक सामना नवी दिशा देतो.मोहाचे दोन क्षण तिच्या आयुष्यात येतात पण ज्या वेगाने येतात त्याच वेगाने ओसरुनही जातात.

बौद्धधर्माच्या पार्श्वभूमीवर पुढे जात रहाणारी ही जीवन रेखा मनात विचारांचे वर्तुळ करुनच जाते.

भुतानच्या कुझांग चोडेने ह्यांची ही पहिलीच इंग्लिश मधील कादंबरी.ह्यात त्यांनी भुतानमधल्या स्त्रीयांचे जीवन दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. एक गोष्ट मात्र पुस्तक वाचतांना सलत रहाते...की दुनियेच्या पटलावर एकीकडे स्री इतकी प्रगतशील आहे तर दुसरीकडे अशा यातनाही तिला सहन कराव्या लागतात,शिक्षणाची दुर्दम्य इच्छा असुनही वंचित रहावे लागावे हे दुर्दैवच...

सोमोच्या आईच्या मृत्युनंतर तिचे सारे जीवनच कलाटणी घेते. लहान भावंदाचा आई होउन सांभाळ,सावत्र ...पण तिच्याच वयाच्या आईशी झालेला तिचा एका वेगळ्या पातळीवरचा संवाद.मृत आईसाठीच्या भावना,त्यासाठी तिर्थक्षेत्री जाउन तिच्या नावाचा दिप लावण्याची तिची इच्छा तिला एकटीला घराबाहेर पडण्याचे बळ देते.या प्रवासातच तिला भेटणारा तिचा प्रियकर...नंतर लग्न,नव-याचेच बहिणेबरोबरही संबंध हे कळल्यावर झालेली जीवाची घालमेल त्यातच पहिल्या असफल प्रसूतीनंतर आलेले दुर्दैवी आजारपण...यातच बहिणीचा तरी संसार मार्गी लागावा यासाठी घेतलेला घर सोदण्याचा कठोर निर्णय,आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात.....या प्रवासात भेटणारी अनोळखी पण जीवाभावाची माणसे...अनाकलनीय स्तितीत झालेले दुसरे लग्न त्यातुनही होणारी फसवणुक....एक विफल आयुष्य पण स्वबळावर या सा-या दु:खावर केलेली मात....



1 comment:

  1. ya kadambariche marathi kiwan hindi anuwad kelela aahe ka ? jar kela asel tar plz pustakache nav , aani anuwadkache nav kalwal tar anand hoil my mail id is mukund.lokhande@gmail.com

    ReplyDelete