Friday, September 24, 2010

आभाळाचे गाणे....रविंद्र भट

रविंद्र भटांच्या लिखाणाची सर्वांत आवदती बाजू म्हणजे त्याचे लिखाण खुप ओघवते असते. भाषा शैली अगदी घरातल्या सोवळ्यासारखी. मनात गुंजत रहाणारी. पुस्तक वाचून झाले तरी परत परत त्या कथेकडेच मन धाव घेत रहाते. ’आभाळाचे गाणे’ खुप अथांग आहे. असे गाणे ज्याला गवसते आणि त्याचा अर्थ ज्याच्या पदरी पडून तो त्याचे सार्थक करतो ते आयुष्य खरच कारणी लागते. सुरुवातील हे आभाळाचे गाणे पुढे येणा-या विस्तृततेची पायरी दाखवून टाकते.

क्षितिजावरची सीमारेषा कवेत घेणे
आभाळाचे गाणे ॥ धृ ॥

सूर्यरथाच्या अश्वासंगे,
गुरूशुक्राच्या भ्रमणासंगे,
दिक्कालाचे बंधन तोडुन,
अनंतरुपी उरणे ॥१॥

असेल जेथे सजीव सृष्टी,
करणे तेथे पायस वृष्टी,
मातीमधल्या वात्सल्याला,
स्पर्शून जागे करणे ॥२॥

ज्वालामिखिची दूर्गम शिखरे,
 रण वाळूचे कोठे विखरे ।
जलचर भूचर सर्वांवरती,
 नील छत्र मज धरणे ।३॥

यज्ञ घडावा सदा अलौकिक,
स्वर हृदयातुन उमटो सात्विक ।
जगन्नियता म्हणो तथास्तु,
तम दुरितावे विरणे ॥४॥

भाऊ बंदकीला टाळून दामोदर्पंत आपली पत्नी सावित्री आणि विधवा बहिण गोदाक्का यांच्या समवेत फणसावळ सोडून वाईकडे प्रस्थान करतात. तिथे रास्त्यांच्या आश्रयाला येतात आणि कृष्णेच्या तिरावर वसलेल्या आसगावची आणि गणकेश्वराची आजीवन सेवा करण्याची शपथ घेतात. सावकारी करतांनाही प्रहिले ध्येय गरजूची मदत हेच ठेवून जाती धर्म,गरिब श्रीमंत असा भेदभाव टाळून एकीचा मंत्र सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनच इतर सावकारांचा रोष पत्करतात तसाच बहिष्कारही. पण लहान पणापासूनच एकीचे आणि समानतेचे बाळकडो ते आपल्या मुलाला सदाशिवाला आणि यमुनेला पाजतात. यात पदोपदी सावित्री आणि गोदाकका साथ देतात. आपण जे करतोय त्याचे परिणाम काय होतील हे ठाऊक असुनही ते पाऊल मागे न घेता पुढे जात रहातात. सदाशिवाच्या मुंजीला कोणताही गावातला भट ब्राह्मण येणार नाही असे कळते तेव्हा ते वाईकडे निघतात आणि सदाशिवाला सांगतात तुझी मुंज झाली की आपण कुळदेवतेचा गोंधळ घालू. हा गोंधळ का आणि कशासाठी हे जेव्हा सदाशिव उर्फ आप्पा विचारतो तेव्हा त्याला इतक्या मार्मिकपणे ते उत्तर देतात की आपल्यालाही त्या अनुभवातून जाण्याची इच्छा होते. ते म्हणतात,"गोंधळ म्हणजे आदिमायेच्या सगुणस्वरुपाला सज्जनांनी घातलेलं साकडं. सद्धर्माच्या संरक्षणासाठी ! सात्विक भावाच्या अभिवृद्धीसाठी ! स्व:ताच माणुसपण सदैव जागृत ठेवण्यासाठी ! माणसाच्या मनी जन्मत:च एक राक्षस असतो. तो सदैव दान मागत असतो. क्रोधाचं ! मदाचं ! लोभाचं ! मोहाचं ! मत्सराचं ! कितीही आहुत्या घातल्या तरी त्याची भूक कधीही सरु पाहत नाही. मग तो गिळायला लागतो सा-या माणूसजातीला. त्याच्या चांगुलपणाला ! त्याच्या वात्सल्यभावाला ! त्याच्या भ्रातृभावाला ! जन्मदात्या आईचं काळीज मागतो आपली हावरट भूक भागविण्यासाठी ! हिरण्यकश्यपू होऊन पोटच्या पोराची खाण्दोळी करतो ! प्रत्यक्ष परमेश्वरालाही लत्ताप्रहार करायला मगं पुढं पाहात नाही...! आणि या सा-यातुन होतो लय ! सा-या स्रुष्टीचा ! तिच्या सर्जनाचा ! तिच्या उदरातले नवनिर्मितीचे कोवळे गर्भ उदरातच चिरदले जातात ! मनातल्या राक्षसाच्या जो आहारी जातो,तो होतो दुर्जन ! फक्त स्व:ताच्या स्वार्थाचा विचार करणारा. तो होतो लंपट. फक्त स्व:ताच्या भोगासाठी धावणारा...! या राक्षसाच्या आहारी जो जात नाही, तो सज्जन.तो देवमाणूस. त्याला हवी असते शांती ! त्याला हवा असतो सहवास ! त्याला हवा असतो निरामय, नि:स्वार्थ आनंद ! त्याला व्हायचं असतं आकाश. सा-या धरित्रीवर पांघरुण घालणारं ! त्याला व्हायचं असतं वाहणारी नदी. सा-या तहानलेल्यांची तहान भागविणारी ! आणि या सा-यांसाठी त्याला हवा असतो आशीर्वाद. सृष्टीकर्त्याचा. आदिमायेचा ! या आशीर्वादाची अतिशय करुणपणे केलेली प्रार्थना म्हणजे संतसज्जनांनी देची पुढे मागोतलेला जोगवा ! तिला जाग येण्यासाठी घातलेला गोंधळ...!!

पुढे मोठा झालेला आप्पा ,वडीलांची धुरा आपल्या खांद्यावर सहज पेलून घेतो. सावकारी गेलेली असते.मिळकत तुटपुंजी असते.यमुनाही सौभाग्य लेणे ्गमवून माघारी आलेली असते.तरी ते हरिजनांना आपल्यात सामावुन घेण्याचा प्रयत्न करतच रहातात. गांधींजीच्या तत्वांना आपले करुन लोकांना जागे करण्याचा प्रयत्न करतात. पारतंत्र्य कसे घातक आहे. त्यासाठी कशी पाऊले उचलावी लागतील ह्याचे ते समर्पक विश्लेषण देतात.त्यांना सदैव साथ गावचा बयाजी पाटील देतो आणि जन्मभराचे पांगळेपणही पदरात पाडून घेतो. आप्पाना मिठाच्या सत्याग्रहातले मिठ विकल्यासाठी तुरुंगवास भोगावा लागतो. त्याच्या मागे यमुना त्यांनी सुरु केलेली शाळा चालवते पण स्वातंत्याचे पाठ पढवते म्हणुन तिलाही तुरुंगाची वाट दाखविली जाते. पुढे दोघांचीही सुटका होते पण खंगलेल्या प्रकृतीमुळे यमुनेचा जीव शांत होतो.
आप्पा घरात नसतांना जमिनीची सालदारी करणारा भिमा परिस्थितीचा गैरफायदा घेउ पहातो तर त्यावेळी खटाशे खट या उक्तीला साजेसे असे आप्पाचा मुलगा गजानन,पिरोजी ह्या रामोश्याची मदत घेतो.
गावाची प्रगति हवी असेल तर आपल्या मुलाने शिकले पाहिजे हे कळून आप्पा गजाननाला पुण्यात पाठवतात तिथुनच त्याच्या संपर्क वृत्तपत्रांशी येतो आणि लढा वेगळ्या पातळीवर येउन पोहचतो. सामाजिक परिस्थितीची जाणिव ही गावातल्या बदलांवरही अवलंबुन आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. गांधी हत्येनंतर गावोगावी ब्राह्मणाची घरे जाळली जातात त्यात त्यांचेही घर भस्मसात होते आणि त्यातच आप्पाची बायकोही.
पुढे गजानन अमेरीकेला जातो.
स्वातंत्र्योत्तर जी प्रगतीची पाऊले पडू लागतात त्यातच कृष्णेवर मोठे धरण बांधण्याचे थरले जाते आणि त्यात  आसगाव आणि अशी अनेक गावे बुडीताखाली जाणार असे निश्चित होते.गावातील लोकांना इतर ठिकाणे प्रस्थापित करण्यात येते असते. पावसाळ्याचे दिवस असतात. कृष्णामाई दुधडी भरुन वाहत असते. आसगाव रिकामे व्हायला सुरुवात होते. आप्पा गणकेश्वराच्या मंदिरात जातात. पाण्याचा लोट येतो. आणि गणकेश्वरासकट आप्पाही जलसमाधिस्त होतात.

गजानन परततो...आणि बातमी देत असतो..मी गजानन सदाशिव भावे...एकेकाळी इथे आसगाव होते...

No comments:

Post a Comment